जसजशी महाशिवरात्री जवळ येते, तसतशी सद्गुरुंची इच्छा असते की, प्रत्येकाला, ते कुठेही असले तरी आदियोगीच्या कृपेचा लाभ घेता यावा. आदियोगीची कृपा संपादन करायचा एक मार्ग म्हणजे रुद्राक्ष दीक्षा प्राप्त करणे. हा अधिक जागरूक होण्याचा आणि कृपेसाठी पात्र होण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. ह्यात विविध माध्यमांचा आणि एका विशिष्ट साधनेचा उपयोग केला जातो. रुद्राक्ष दीक्षा ही शिवाच्या आनंदाश्रूंमध्ये तुमचे शरीर, मन आणि ऊर्जा भिजवण्याची संधी आहे!
आपण https://mahashivarathri.org/mr/rudraksha-diksha वर ऑनलाईन नोंदणी करू शकता
आम्ही व्हॉट्सअॅप व मिस्ड कॉल अलर्ट सिस्टमद्वारे नोंदणी प्रक्रिया तयार करत आहोत. अधिक तपशील लवकरच या वेबसाइटवर उपलब्ध होईल. तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना रुद्राक्ष दीक्षा भेट सुद्धा करू शकता.
नाही. रुद्राक्ष दीक्षा विनामूल्य दिली जाते. ही विनामूल्य आपल्या घरी देखील पोचवली जाते. हे सद्गुरूंनी आदियोगीची कृपा प्राप्त करण्याचे साधन म्हणून प्रदान केले आहे.
साधनेतील साधकास मदत करणार्या इतर साहित्यांबरोबरच जगभरात १० लाखाहून अधिक खास प्राणप्रतिष्ठित केलेले रुद्राक्ष तयार केले जात आहेत.
तुम्हाला जमेल तितकी देणगी तुम्ही देऊ शकता आणि रुद्राक्ष दीक्षेच्या माध्यमातून प्रत्येकाला आध्यात्माचा एक थेंब देण्यास मदत करु शकता.
तुमच्या रुद्राक्ष दिक्षेचा भाग म्हणून तुम्हाला फक्त एकच रुद्राक्ष आवश्यक आहे. परंतु, तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना वाटू इच्छित असल्यास तुम्ही प्रत्येक मोबाइल क्रमांकावर जास्तीत जास्त २ रुद्राक्षांसाठी नोंदणी करू शकता.
नक्कीच. तुमच्या इच्छेनुसार जास्तीत जास्त लोकांना रुद्राक्ष दिक्षा देऊ शकता आणि त्यांच्या आयुष्यात अध्यात्माचा एक थेंब शिंपु शकता.
तुम्ही सर्वांना रुद्राक्ष दीक्षा देण्याच्या संधी साठी रुद्राक्ष सेवेसाठी नोंदणी करू शकता. या संकेतस्थळावर लवकरच तपशील दिले जातील.
होय सद्गुरूंनी प्रथमच रुद्राक्ष दीक्षा घेण्याची शक्यता खुली केली आहे. त्यामध्ये रुद्राक्ष तसेच विभूती, अभय सूत्र आणि आदियोगी फोटो समाविष्ट आहे.
महाशिवरात्रीला लाखो भाविकांना रुद्राक्ष दीक्षा प्रदान केली जाते. मोठ्या प्रमाणात पॅकेजेस पाठवण्यात येत आसल्यामुळे ते पोचायला काही महिने लागू शकतात.
आम्ही तुमच्या सहकार्याची आणि समंजसपणाची अपेक्षा करतो. कृपया नोंद करा की शिपिंग इंडिया पोस्टद्वारे होईल.
हो. ते पाठवल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल. त्यानंतर, तुम्ही येथे तुमचे रुद्राक्ष दीक्षा पॅकेज ट्रॅक करू शकता. isha.sadhguru.org/mahashivratri
रुद्राक्ष दीक्षा पॅकेजची नोंदणी किंवा वितरण संबंधित मुद्द्यांच्या बाबतीत भारतातील लोक आमच्याशी rudraksh.diksha@ishafoundation.org वर संपर्क साधू शकतात.
देणगी देण्या संबंधित प्रश्नांसाठी Rudrakshdiksha.payment@ishafoundation.org. ला लिहू शकता.
सर्व पॅकेजेसची पाठवण्यापूर्वी व्यवस्थित तपासणी केली जाईल. पण, प्रवासात चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे रुद्राक्षाचे काही नुकसान झाले असेल तर कृपया त्याचा वापर करू नका. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
जर तुमचे रुद्राक्ष दीक्षा पॅकेज खराब झाले असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. जर तुम्ही काही कारणास्तव ते परत करणार असाल किंवा ते वापरणार नसाल, तर कृपया ते आम्हाला परत पाठवा.
रुद्राक्ष दीक्षा पॅकेजची नोंदणी किंवा वितरण संबंधित मुद्द्यांच्या बाबतीत, भारतातील लोक आमच्याशी rudraksh.diksha@ishafoundation.org वर संपर्क साधू शकतात.
हो, तुम्ही हे इतर रुद्राक्षासोबत घालू शकता.
रुद्राक्ष हे वैज्ञानिक भाषेत एलेओकारपस गॅनिट्रस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झाडाच्या सुकलेल्या बिया असतात. दक्षिणपूर्व आशियाच्या निवडक ठिकाणी, मुख्यतः भारतीय उपखंडाच्या वरच्या हिमालयाच्या पर्वतांमध्ये हे वृक्ष वाढतात. रुद्राक्षाचा शब्दशः अर्थ आहे “शिवाचे अश्रू”.
शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यात रुद्राक्ष खूपच सहाय्यक आहे. रुद्राक्ष रक्तदाब कमी करण्यास, मज्जातंतूमधील ताण कमी करण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतो. रुद्राक्षाच्या सांगितल्या गेलेल्या काही सूक्ष्म फायद्यांमध्ये अंतर्ज्ञान वाढविणे, ध्यान करण्यात मदत करणे, आभा मंडळ शुद्ध करणे आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण प्रदान करणे समाविष्ट आहे.
कुणीही हा रुद्राक्ष घालू शकतो. वय, लिंग, शारीरिक स्थिती, संस्कृतीक, वांशिक, भौगोलिक किंवा धार्मिक पार्श्वभूमीची मर्यादा नाही. मुले, विद्यार्थी आणि वृद्धांनी परिधान केल्यास ते विशेषतः फायदेशीर ठरू शकते.
रुद्राक्ष नेहमीच तुमच्या गळ्याभोवती घातला पाहिजे.
जर आपण थंड पाण्याने अंघोळ करत असाल आणि कोणतेही रासायनिक साबण वापरत नसाल, तर चालेल. विशेषत: पाणी रुद्राक्षावरून तुमच्या शरीरावर वाहणे चांगले आहे. परंतु जर तुम्ही रासायनिक साबण आणि कोमट पाणी वापरत असाल तर ते ठिसूळ होईल आणि काही काळाने तुटेल. म्हणून अशा वेळी ते परिधान करणे टाळा. कृपया अंघोळ करताना रुद्राक्ष एखाद्या कापडावर ठेवा.
हो, सर्वजण रुद्राक्ष कायम घालू शकतात.
जर काही कारणास्तव, तुम्ही रुद्राक्ष घालू शकत नसाल, तर तो सुरक्षितपणे ठेवला पाहिजे, सूती किंवा रेशीम यासारख्या नैसर्गिक कपड्यात. रुद्राक्ष हे एक अद्भुत रचना असलेले नैसर्गिक बी असल्याने, ते नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेल्या भांड्यामध्ये ठेवणे चांगले. तांबे, सोने किंवा चांदीचे भांडे देखील वापरले जाऊ शकतात.
प्रथम रुद्राक्ष घालण्यापूर्वी काही गोष्टी करणे महत्वाचे आहे. नवीन रुद्राक्ष चोवीस तास तूपामध्ये ठेवा आणि नंतर त्याला दुधात अजून चोवीस तास ठेवा. मग त्याला पाण्याने स्वच्छ धुवा आणि स्वच्छ कपड्याने तो पुसा. साबण किंवा इतर रासायनिक द्रव्याने तो धुऊ नका. हे दर सहा महिन्यांनी एकदा केले पाहिजे.
तांबा हा असा एक धातू आहे जो एक विशिष्ट उर्जा तयार करतो आणि ध्यान करण्यास मदत करतो. शरीराशी त्याचा संपर्क आला तर उर्जा प्रणाली मजबूत आणि स्थिर होण्यास मदत होते.
जर तुम्ही रुद्राक्षाच्या दोन्ही बाजूंना गाठ बांधत असाल तर रुद्राक्ष तुटू नये म्हणून जास्त घट्ट बांधू नका. आतुन तुटला असल्यास, रुद्राक्ष धारण करू नये. तसेच, रुद्राक्षाभोवती तांब्याचे कप करू नका.
https://isha.sadhguru.org/in/hi/wisdom/article/rudraksha-pehne-ke-fayde
विभूती किंवा पवित्र राख शिवाशी संबंधित आहे, शिवाचे बहुतेकवेळा डोक्यापासून ते पायापर्यंत राखेने माखलेले असे चित्र दर्शवले जाते, जे जीवनाच्या नश्वर स्वरूपाचे प्रतीक आहे. अध्यात्मिक प्रक्रियेचा आधार म्हणजे मृत्यूची जाणीव; विभूती याची सतत आठवण करून देते. भारतीय संस्कृतीत, हे साधकासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून देखील वापरले जाते, कारण योग्यप्रकारे तयार केली आणि वापरली तर ती ग्रहणक्षमता वाढवते, तसेच ऊर्जा प्रसारित करण्यासाठी एक उत्तम माध्यम म्हणून काम करते.
परंपरेने, योग्यांनी स्मशानभूमीतली राख वापरली, परंतु विभूती शेण किंवा तांदळाच्या भुश्यापासून देखील बनविली जाऊ शकते.
ईशा विभूतीने ध्यानलिंगाच्या उर्जा आत्मसात केल्या असतात, जिथे ती प्राणप्रतिष्ठेसाठी विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात आली असते.
परंपरेने, विभूती अंगठीचे बोट (अनामिका) आणि अंगठा यामध्ये घेतली जाते आणि शरीरावर वेगवेगळ्या बिंदूंवर लावली जाते: भुवयांच्या मध्ये, ज्याला अग्न चक्र म्हणून ओळखले जाते; गळ्याच्या पोकळीवर , ज्याला विशुद्धी चक्र म्हणून ओळखले जाते; आणि छातीच्या मध्यभागी जिथे बरगड्या जुळतात, ज्याला अनाहत चक्र म्हणतात.
विभूती स्पष्टता वाढविण्यासाठी अग्न चक्रावर लावली जाते; तुम्ही जसे आहात त्यामध्ये एक विशिष्ट सामर्थ्य आण्यासाठी विशुद्धिवर लावली जाते, जीवनात प्रेम आणि भक्तीचे आयाम आणण्यासाठी अनाहतावर लावली जाते.
"आदियोगीचे महत्त्व म्हणजे त्याने मानवी चेतना विकसित करण्यासाठी अशा पद्धती प्रदान केल्या ज्या प्रत्येक काळात उपयोगी ठरतात." - सद्गुरु
सुमारे पंधराहजार वर्षांपूर्वी, कोणताही धर्म अस्तित्वात येण्याआधी, प्रथम योगी, आदीयोजिने आपले सात शिष्य, सप्तर्षी यांना योगाचे विज्ञान प्रसारित केले. त्याने ११२ मार्ग प्रदान केले ज्याद्वारे मनुष्य आपल्या अस्तित्वाच्या सीमित मर्यादा पार करून त्याच्या परम शक्यतेपर्यंत पोहोचू शकतो. आदियोगींनी वैयक्तिक परिवर्तनाची साधने देऊ केली आहेत, कारण वैयक्तिक परिवर्तन हाच जग परिवर्तित करण्याचा एकमेव मार्ग आहे. त्याचा मूलभूत संदेश असा आहे की मानवी कल्याण आणि मुक्तीसाठी “आपल्या आत वळणे हाच मुक्त होण्याचा एकमेव मार्ग” आहे.
हजारो वर्षांपूर्वी अदियोगींनी मानवतेला जी परिवर्तनाची साधने दिली ती आत्ताच्या काळासाठी केवळ उपयुक्तच नाहीत तर आवश्यकही आहेत. ईशा योग केंद्रातील आदियोगीचा ११२ फूट चेहरा सर्वांना याची एक आठवण आणि प्रेरणा आहे.
अभय सूत्र हा एक खास पवित्र धागा आहे जो मनगटाला बांधला जातो. “अभय” चा शब्दशः अर्थ “निर्भय” आहे आणि तुमच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अभय सूत्र सहाय्यक आहे.
अभय सूत्र सूती धाग्याने बनलेले आहे.
स्त्रियांनी ते सूत्र आपल्या डाव्या मनगटावर आणि पुरुषांनी उजव्या मनगटावर बांधावे. ते किमान ४० दिवस ठेवले पाहिजे. त्याची गाठ सोडून किंवा जाळून ते काढता येईल (कृपया तो कापू नका). ते ओल्या मातीमध्ये पुरून टाकू शकतो किंवा जाळून टाकून त्याची राख विशुद्धी चक्रापासून (गळ्याची पोकळी) अनाहत चक्रापर्यंत (छातीच्या बारगाड्या जुळतात ती पोकळी) लावू शकतो.
https://isha.sadguru.org/in/en/wisdom/article/sutra-more-than-a-thread
रुद्राक्ष दीक्षेसाठी नोंदणी केलेले लोक सहभागी होऊ शकतात.
कृपया अशा ठिकाणी बसावे जिथे तुम्हाला शारीरिक त्रास होणार नाही. दिवा लावणे आणि पोट हलके ठेवणे अनुकूल राहील.
हो. तुम्ही दीक्षा सत्रात सहभागी होऊ शकता आणि सद्गुरूं देतील त्या सूचनांचे पालन करू शकता.
कृपया दीक्षा सत्रात भाग घ्या आणि सद्गुरूंनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
हो, ते उपस्थित राहू शकतात.
हो. जर तुम्ही रुद्राक्ष दीक्षेसाठी आधीच नोंदणी केली असेल, तर तुम्ही याआधी कोणत्याही ईशा कार्यक्रमात न जाता देखील दीक्षेला उपस्थित राहू शकता. अशी कोणतीही पूर्व-आवश्यकता नाही. प्रत्येकाला अध्यात्माचा एक थेंब अर्पण करणे हा सद्गुरूंचा उद्देश आहे. रुद्राक्ष दिक्षा ज्यांची इच्छा असेल, त्या सर्वांना प्रदान केली जाईल.
कार्यक्रमाच्या स्वरूपामुळे, कृपया इतरांना ती शिकवू नका. ही एक विशिष्ट दीक्षा प्रक्रिया आहे. योग्य स्त्रोताकडून सराव शिकणे महत्वाचे आहे.
दीक्षा सत्राला उपस्थित राहणे खरोखर सहाय्यक राहील. आम्ही सल्ला देतो की तुम्ही उपस्थित राहावे.
हो. कृपया साधना करताना तुम्हाला शारीरिक अस्वस्थता होणार नाही अशी जागा निवडा.
कार्यक्रमासाठी पोट हलके ठेवणे चांगले राहील [ जेवणानंतर २.५ तासांचे अंतर द्यावे ].
जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर आहे. परंतु तुम्हाला ते काही विशिष्ट प्रसंगी काढायचे असल्यास, तुम्ही तसे करू शकता. जर तुम्ही आंघोळीसाठी गरम पाणी किंवा रासायनिक साबण/ शॅम्पू वापरत असाल, तर कृपया आंघोळ करताना ते घालू नका, कारण रुद्राक्ष नैसर्गिकरित्या ठिसूळ असतो. अन्यथा, कोणतेही बंधन नाही.
तुम्ही साधना करू शकता. पण, आम्ही तुम्हाला सूचित करतो की तुम्ही खराब झालेले रुद्राक्ष नदी/ ओढ्यात विसर्जित करू किंवा ओल्या मातीत पुरून टाकू शकता, कारण खराब झालेला रुद्राक्ष घालणे/ वापरणे अनुकूल नाही.
तुम्ही कोणत्याही ठिकाणी सराव करू शकता जिथे तुम्हाला शारीरिक अस्वस्थता होणार नाही.
रुद्राक्ष नेहमी घालणे अत्यंत हितकारक आहे कारण त्याचे अनेक फायदे आहेत. जर ते शक्य नसेल, तर तुम्ही ते पूजा घरात ठेवू शकता. दीक्षेला उपस्थित राहणे आणि सद्गुरूंनी सांगितलेली साधना करणे उत्तम राहील.
कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. तरी साधना करणे एखाद्याच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक प्रवासासाठी एक मोठा आधार आहे.
साधना ही आंतरिक प्रक्रिया आहे. इतरांनी करायचा तो विधी नाही. साधना नेहमी स्वतःच केली जाते. साधना करणाऱ्या लोकांनाच त्याचा लाभ होतो.
हो. दीक्षाला उपस्थित राहण्यासाठी आणि/ किंवा साधना करण्यासाठी आहाराचे कोणतेही बंधन नाही. तरीही पोट हलके ठेवणे अनुकूल राहील.
हो.
हो, दीक्षेला उपस्थित राहणे अत्यंत फायदेचे आहे कारण ते एखाद्याची साधना आणखी प्रखर करण्यासाठी देखील मदत करेल.
हो.
नाही, ते लगेच घातले जाऊ शकते. ते आश्रमाने आधीच कंडिशन केले आहे.
हो, तुम्ही घालत असलेल्या इतर रुद्राक्षांसोबत हा रुद्राक्ष सुद्धा घालू शकता.
हो, दीक्षेसाठी मागील वर्षीचा रुद्राक्ष घालू शकता.
महाशिवरात्रीला लाखो भाविकांना रुद्राक्ष दीक्षा दिली जाते. या मोठ्या संख्येचा विचार करता तुमचे पॅकेज पाठवण्यास काही महिने लागू शकतात.
आम्हाला तुमचे सहकार्य आणि समजुद्दारपणा अपेक्षित आहे. तुमचे पॅकेज इंडिया पोस्ट द्वारे पाठवले जाईल याची कृपया नोंद घ्यावी .
वितरणाची संख्या मोठी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला धीर धरण्यास आणि पॅकेज ट्रॅक करत राहण्यास सुचवतो.
जी कुरिअर कंपनी *(त्याऐवजी टपाल विभागाचा उल्लेख करा) पॅकेजिंग आणि डिलिव्हरी हाताळत आहे, ती ते टप्याटप्यात करत आहे.
रुद्राक्ष मिळताच त्याला कंडिशन करायची गरज नाही, कारण ते आधीच कंडिशन केलेले आहे. तुम्ही दर ६ महिन्यांनी रुद्राक्ष २४ तास तुपात आणि पुढील २४ तास दुधात ठेवून कंडिशन करू शकता. नंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घालू शकता.
तशा कोणत्याही अटी नाहीत. हा रुद्राक्ष इतर रुद्राक्षांसोबत घातला जाऊ शकतो. तो घालण्यापूर्वी कोणतिही पूजा करण्याची गरज नाही कारण तो आधीच प्राणप्रतिष्ठेच्या प्रक्रियेद्वारे पवित्र केलेला आहे.
काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही रुद्राक्षाची काळजी घेऊ शकता:
दर ६ महिन्यांनी, रुद्राक्ष फुटू नये म्हणून तुम्ही ते २४ तास तुपात आणि पुढील २४ तास दुधात ठेवू शकता. कंडिशनिंग केल्यानंतर, तुम्ही तो स्वच्छ पाण्याने धुवून घालू शकता.
कोणत्याही प्रकारच्या रसायनापासून तो दूर ठेवावा.
आंघोळीच्या वेळी, कोणताही रासायनिक साबण वापरत असल्यास, कृपया रुद्राक्ष काढून स्वच्छ पांढर्या कापडावर (शक्यतो नैसर्गिक फायबरच्या) ठेवावा.
रुद्राक्ष सुती धाग्याने किंवा कच्च्या रेशमाच्या धाग्याने गळ्यात घातला पाहिजे. तो तांबे, चांदी किंवा सोन्याच्या चेनमध्ये देखील घातला जाऊ शकते, परंतु हे सुनिश्चित करा की रुद्राक्ष कापू नका किंवा वायर घट्ट बांधू नका, कारण यामुळे रुद्राक्ष खराब होऊ शकतो किंवा त्याला तडा जाऊ शकतो. पॅकेजमध्ये रुद्राक्षाच्या धाग्याचा समावेश आहे. कृपया पुढील प्रश्नाचा संदर्भ घ्या.
पॅकेजमध्ये २ वेगळे धागे आहेत :
रुद्राक्ष गळ्यात घालण्यासाठी लहान धागा वापरावा.
जे मोठे आहे ते अभय सूत्र आहे, जो संशय आणि भीती दूर करण्यासाठी प्राणप्रतिष्ठित केलेला धागा आहे. अभय सूत्र किमान एक मंडळ तरी (४८ दिवस) घातला पाहिजे आणि तो साधारणपणे तीन ते चार महिन्यांपर्यंत प्रभावी असेल. तुम्ही हे सूत्र तुमच्या घड्याळ किंवा इतर दागिन्यांसह, ते टिकेल तोपर्यंत घालू शकता.
काढण्यासाठी, तुम्ही एकतर अभय सूत्राची गाठ सोडून खोलू शकता किंवा जाळून खोलू शकता. अभय सूत्र कधीही कापू नये.
तुम्ही खालीलपैकी एका प्रकारे सूत्र विसर्जन करू शकता:
फुलांच्या किंवा फळांच्या झाडाच्या फांदीवर बांधा.
माती ओलसर असलेल्या झाडाखाली पुरून टाका.
ते जाळून टाका आणि तुमच्या विशुद्धी चक्रापासून (घशाची पोकळी) अनाहत चक्रापर्यंत (छातीच्या बरगड्या जुळतात त्याच्या अगदी खाली) त्याची राख लावा.
जर तुम्ही आमच्या वेबसाइटद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर तुमची नोंदणी झाली म्हणून तुम्हाला एसएमएस येईल. जर तुम्हाला मेसेज आला असेल, तर तुमची रुद्राक्ष दीक्षेसाठी नोंदणी झाली आहे आणि तुम्हाला पॅकेज मिळेल.
जर तुम्ही नोंदणी केली असेल परंतु एसएमएस आला नसेल, तर कृपया आम्हाला तुमच्या नोंदणीबद्दल माहिती देण्यासाठी ईमेल किंवा फोनद्वारे आमच्याशी संपर्क साधा.
रुद्राक्ष दीक्षेसाठी तुमच्या देणगी आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला माहिती आहेच की, रुद्राक्ष दीक्षा ही प्रत्येकाच्या जीवनात अध्यात्माचा एक थेंब आणण्यासाठी सद्गुरूंनी दिलेली एक भेट आहे. तुमच्यासारख्या देणगीदारांमुळे, आम्ही अनेकांना ही भेट मोफत देऊ शकलो आहोत. तुम्ही देणगी दिली असली तरी पॅकेज प्राप्त करण्यासाठी रुद्राक्ष दिक्षेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.